शरद पवारांसमवेत अजित पवारांची गुप्त भेट

| पुणे | वृत्तसंस्था |

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाल्याची जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. चांदनी चौकातील कार्यक्रम आटोपल्यावर सरकारी ताफा सोडून अजित पवार हे कोरेगाव पार्क येथे रवाना झाले. तत्पूर्वी तेथे आधीच शरद पवार आणि जयंत पाटील हे उपस्थित होते. हे सर्वजण सायंकाळी पाच वाजेपर्यंत तेथे उपस्थित होते. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी परस्परांची मने वळविण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. चोरडिया यांच्या बंगल्यातून परत जाताना अजित पवारांची गाडी गेटला धडकल्याचे प्रसारमाध्यमातून दाखविण्यात आले. यावेळी ते मागीच सीटवर झोपले होते. दरम्यान, याबाबत उभयतांकडून अद्याप अधिकृतपणे काहीच खुलासा करण्यात आलेला नाही.

Exit mobile version