। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोलजवळील समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींमध्ये एके 47 रायफल सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हायअलर्ट जारी झाला आहे. स्थानिकांच्या मदतीनं ही बोट किनार्यावर आणण्यात आली. पण ही बोट नेमकी कोणाची आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. यापैकी एका बोटीमध्ये तीन एके-47 रायफल्स सापडल्या आहेत. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे मात्र याबाबतची अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला असून दुपारनंतर माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले.
धक्कादायक! हरिहरेश्वरमधील त्या बोटीत सापडली एके ४७
