| रसायनी | प्रतिनिधी |
ब्रम्हलिन हभप गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर यांच्या कृपाआशिर्वांदाने वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळ रसायनी पाताळगंगा आयोजित श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सुवर्ण जन्मोत्सव तपपुर्ती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त श्री तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह मोहोपाडा येथील जनता विद्यालय मैदानावर बुधवार दि.26 पासून सुरु होत आहे. या सप्ताहात प्रवचन, हरिपाठ तसेच सायंकाळी 7 ते 9 वाजता सुप्रसिध्द महाराजांची किर्तंने होणार आहेत. बुधवार दि.3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 12 वा. हभप राम महाराज सोलापूरकर (जोग महाराज) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. या सप्ताहासाठी वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळ रसायनी पाताळगंगा, खालापूर व पनवेल तालुका अथक परिश्रम घेत आहे.







