अखिल शेरॉन, अनिश भानवाला यांना ग्रांप्रि नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण

| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

पॅरिस ऑलिंपिक कोटा मिळवणारे नेमबाज अखिल शेरॉन आणि अनिश भानवाला यांनी पॉलिश ग्रांड प्रिक्स चॅम्पियन्स स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली. शेरॉनने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात 468.4 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. पॅट्रिक जेनी या झेकोस्लावाकिया खेळाडूपेक्षा शेरॉनने 2.2 गुणांची अधिक कमाई केली. भानवाला याने जोसेफ झापेजस्की ग्रांप्रि स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. शेरॉन आणि भानवाला या दोघांच्या या स्पर्धा एका वेळी झाल्या.

भारताचे 50 मीटर आणि 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारातील काही खेळाडू युरोपमध्ये विविध स्पर्धांत अनुभासाठी सहभागी झाले आहेत. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर हा सराव महत्त्वाचा आहे. नौदलाचा नेमबाज निरज कुमार यानेही रायफल थ्री पोझिशन प्रकारात दोन ब्राँझपदके मिळवून प्रभाव पाडला. या स्पर्धेत दोन पदके मिळवणारा तो एकमेव भारतीय ठरला. प्राथमिक फेरीत निरजने 595 आणि 594 अशी कामगिरी केली.

पहिल्या फेरीत तो रिओ ऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सेर्थी कुलिशनंतर निरजने दुसरा क्रमांक मिळवला होता. या प्रकारात महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे याने प्राथमिक फेरीत 595 गुणांची कमाई केल, परंतु त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवणार्‍या श्रीयांका सदांगी आणि अशी चोक्षी यांनी महिलांच्या थ्री पोझिशनमध्ये ब्राँझपदके मिळवली. हे भारतीय नेमबाज आज ड्रॉटमंड येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर्मनीला रवाना होणार आहेत.

Exit mobile version