अलिबागमध्ये अक्षया नाईक विजयी; शेकापच्या हाती सत्ता

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया रविवारी सकाळी पार पडली. नगराध्यक्षसह नगरसेवकपदाच्या अठरा जागांवर महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. त्यामध्ये नगरसेवकपदाचे १७ उमेदवार निवडून आले आहेत. तर नगराध्यक्षपदाच्या अक्षया यांनी 8974 मते मिळून भाजपच्या तनुजा पेरेकरांचा दारुण पराभव केला. त्यामुळे अलिबाग नगरपरिषदेची सत्ता शेकापच्या हाती आली आहे.

Exit mobile version