आक्षीमध्ये शेकाप-काँग्रेस आघाडीच्या प्रचाराला वेग

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायतीच्या शेकाप, काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ सोमवारी (दि.12) झाला असून, (दि.13) दुसऱ्या दिवशी सुद्धा थेट सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार आणि कार्यकर्ते जोमाने प्रचार करत आहेत.

यावेळी आघाडीच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार रश्मी पाटील गावाच्या विकासासाठी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा, असे आव्हान करत होत्या. तसेच नागरिकांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत होता.

Exit mobile version