। आक्षी । प्रतिनिधी ।
कबड्डीसाठी लोकप्रिय असलेले गावा क्रिकेटमध्ये सुद्धा मान उंचावू पहात आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच खेळवल्या गेलेल्या अलिबाग तालुक्यातील आक्षी येथे खेळवण्यात आलेल्या आक्षी-साखर प्रीमियर लीगला उदंड प्रतीसाद मिळाला होता. त्यामुळे ह्या वर्षी सुद्धा आक्षी-साखर प्रीमियर लीग खेळवली जाणार आहे. त्यासाठी सोमवारी (दि.9) एकूण 16 संघांसाठी नागाव इथे खेळाडूंच्या लिलावाचा कार्यक्रम पार पडला.
गत वर्षाचे विजेतेपद मंगलमूर्ती साखर या संघाने भुषविले असून दुसर्या सत्रामध्ये कोण विजेता होणार, हयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच या लीगमुळे आक्षी व आजुबाजुच्या परिसरातील खेळाडूंना आपला खेळ दाखविण्याची उत्तम संधी प्राप्त झाली आहे.
सदरील सामने स्वराज्य आक्षी मैदान (साईनगर) येथे 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान खेळवले जाणार आहेत.
आक्षी-साखर प्रीमियर लीग संघ
मंगलमूर्ती साखर, सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर, गण वॉटर स्पोर्ट्स साखर, प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर, रोनित वॉरियर्स साखर, प्रदीप स्पोर्ट्स साखर, नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर, रॉयल किंग ग्रुप साखर, एल.पी. ग्रुप साखर, जरी मरी आई 11 साखर, आभाळमाया कॉटेज आक्षी, सिया वॉरियर्स नागाव, युवराज किंग्ज 11 नागाव, युक्ता स्पोर्ट्स आक्षी, रुहान 11 साखर, प्रित 11 साखर.