आक्षी-साखर प्रीमियर लीग; युक्ता स्पोर्ट्स आक्षी विजयी

| आक्षी । प्रतिनिधी ।

आक्षी, ता. अलिबाग येथे खेळवल्या गेलेल्या आक्षी-साखर प्रीमियर क्रिकेट लीग पर्व-2 च्या अंतिम सामन्यात संघ मालक रश्मीन गुरव यांचा युक्ता स्पोर्ट्स आक्षी हा संघ विजयी झाला आहे. स्वराज्य आक्षी मैदानावर खेळवल्या गेलेल्या या क्रिकेट स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता.


29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी अशा चार दिवस चाललेल्या आक्षी-साखर प्रीमिअर लीग पर्व-2 च्या या स्पर्धेत युक्ता स्पोर्ट्स आक्षी संघ विजेता ठरला, तर आभाळमाया कॉटेज आक्षी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि गण वॉटर स्पोर्ट्स साखर यांना तिसर्‍या व चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेदरम्यान राजकीय पक्षांच्या नेत्यांसह विविध मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. स्पर्धेतील विजेत्या संघाला आकर्षक चषक व उपसरपंच आनंद बुरांडे यांच्याकडून रोख रक्कम 55,555/- व उपविजेत्या संघाला आकर्षक चषक व कैलास चौलकर यांच्याकडून रोख रक्कम 33,333/- तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला उलेश नाखवा व शाम गण यांच्याकडून प्रत्येकी 22,222/- रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

तसेच मालिकावीर धनंजय पाटील (संपूर्ण मालिका 101 वैयक्तिक रन), उकृष्ट फलंदाज राहुल मुजावर (संपूर्ण मालिका 99 वैयक्तिक रन), उत्कृष्ट गोलंदाज विनय राऊत (संपूर्ण मालिका 09 वैयक्तिक विकेट) यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version