संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला अलिबाग प्रांत कार्यालयात दारू पार्टी…पहा व्हिडीओ

कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला अलिबाग प्रांत कार्यालयात कर्मचार्‍यांनी दारू पार्टी केल्याने अलिबाग तालुक्यात खळबळ उडाली आहे. या दारुबाज कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी निलेश पाटील यांनी महसूलमंत्री, मुख्य सचिव, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांत यांच्याकडे केली आहे. निलेश पाटील यांना प्रांत कार्यालयात काही कर्मचारी दारू पार्टी करित असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला निलेश पाटील सांयकाळी प्रांत कार्यालयात पोहचले. तेंव्हा तीथे कर्मचारी वरंडे, तहसील कार्यालयातील कर्मचारी निकम यांच्यासह तीन कर्मचारी वरंडे यांच्या टेबल वर दारू पित असल्याचे निदर्शनास आले.

हा धक्कादायक प्रकार पाटील यांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला. त्यानंतर शुक्रवारी पाटील यांनी थेट महसूलमंत्री, मुख्य सचिव, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांत, पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देत या सत्यता तपासून या कर्मचाऱयानवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version