| उरण | प्रतिनिधी |
जून महिना उजाडून पावसाला सुरुवात होण्याआधीच रानभाजी ओळखली जाणारी शेवळाची भाजी उरणच्या बाजारात विक्रीसाठी आली आहे. शेवळाची जुडी ही 50 रुपयाला विकली जात आहे. काही दिवसात भाजी विक्रीसाठी बाजारात जास्त आल्यानंतर जुडीचा दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेवळाची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ड जीवनसत्त्व असलेल्या भाज्या खूप कमी आहेत. त्यातली एक शेवळाची भाजी समजली जाते. स्त्रियांच्या आरोग्यासाठी ही भाजी महत्त्वाची मानली जाते. पावसाळा सुरु झाला की रानभाज्यांचे वेध लागतात. दाट जंगलात आपोआप उगवणार्या, सर्वत्र उपलब्ध न होणार्या या भाज्या म्हणजे चवीची मेजवानी असतात. एका मर्यादीत कालवधीत उपलब्ध होणार्या या रानभाज्या म्हणजे पोषक गुणांची खाण असतात. शेवळाच्या भाजीला जंगली सुरण असेही म्हणतात.
खास मराठी लोकांच्या आहारात पावसाळ्यातल्या या शेवळाच्या भाजीला मोठे महत्त्व आहे. शेवळाच्या भाजीला इंग्रजीमधे ड्रॅगन स्टॉक याम असे म्हणतात. महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या वैशिष्ट्यांपैकी एक असलेली ही शेवळाची भाजी. ही भाजी डोंगराळ भागात दाट जंगलात येते. त्याची शेती करता येत नाही. ही भाजी एका देठासारखी दिसते. महाराष्ट्रातल्या गावाकडच्या बाजारात ही भाजी मिळते. गुणांनी पौष्टिक असलेली ही रानभाजी केवळ सात ते दहा दिवसच उपलब्ध असते. या रानभाजीत आतड्यातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्याची क्षमता असते. ही भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. या भाजीत तंतूमय घटक जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी ही भाजी लाभदायक आहे. शेवळाची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. या भाजीमुळे आतड्यातील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते. शेवळामधे जीवनसत्त्व, अँण्टिऑक्सिडण्टस आणि खनिजे असतात. यात ब-12 आणि ड जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. स्त्रियांच्या आरोग्यासाठी ही भाजी महत्त्वाची मानली जाते. शेवळाची भाजी करण्यासाठी शेवळाची एक जुडी, कांदे, लसूण, लाल मिरची, मीठ, तेल, मोहरी, हिंग, गरम मसाला, हळद, खोवलेले ओला नारळ एवढे जिन्नस लागतात. शेवळाची भाजी करताना देठाचा खालचा भाग काढून टाकावा आणि केवळ वरचा भागच घ्यावा. शेवाळ बारीक चिरुन मग फोडणीला घालून कुकरमधे शिजवावी लागते. अशी ही रानभाजी समजली जाणारी शेवळाची रानभाजी उरणच्या बाजारात पावसाळा सुरुवात होण्याआधीच विक्रीसाठी दाखल झाली आहे. शेवळाची जुडी ही 50 रुपयाला विकली जात आहे. काही दिवसात भाजी विक्रीसाठी बाजारात जास्त आल्यानंतर जुडीचा दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.