अलिबाग शहर शेकापक्षाचा मेळावा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन बुधवार दि. 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थित भाग्यलक्ष्मी हॉल, चेंढरे येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला शहरातील सर्व शेकाप महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले आहे.

Exit mobile version