नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत अलिबागच्या खेळाडूंची बाजी

27 सुवर्ण,12 रौप्यपदकांची कमाई
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पहिली इंडो नेपाळ इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशीप स्पर्धा 2022 नुकतीच नेपाळ मधील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, काठमांडू येथे पार पडली. या स्पर्धेत भारतातील 72 कराटेपटू सहभागी झाले होते. यात अलिबाग मधील कराटेपटू यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे.यामध्ये अलिबागच्या 27 जणांना सुवर्णपदक तर 12 जणांना रौप्यपदक प्राप्त झाले.या सर्व खेळाडूंना अलिबागचे कराटे प्रशिक्षक राहूल तावडे यांचे मार्गदर्शन लाभले.

वरील स्पर्धा नॅशनल स्पोर्ट्स कौन्सिल, नेपाळ व नेपाळ ऑलिम्पिक कमिटी यांच्या मान्यतेनुसार घेण्यात आली होती. या स्पर्धेत भारतातील 72 तर नेपाळमधील 150 कराटेपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत कटा व कुमिते या विभागात अलिबाग मधील कराटेपटूनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

स्पर्धेतील विजेते कटा विभागात सुवर्ण पदक विजेते
1 लव्या घाडगे , 2 मोक्षदा पाटील, 3 राजनंदिनी खपाले, 4 मुमुक्षा घरत, 5 साईशा मुंबईकर, 6 राजलक्ष्मी सगर, 7. विधी ठाकूर, 8. अनय पाटील, 6 राजलक्ष्मी सगर, 7. विधी ठाकूर, 8. अनय पाटील, 9.आदित्य चोरगे, 10. सिद्धेश यादव, 11. वरद यादव, 12. ईशान वैशंपायन, 13.तनिष्क तावडे, 14. आयुष्य अंबाडे, 15. अद्वैत म्हात्रे, 16. कार्तिक गावंड, 17. देवांक ढवळे

नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत अलिबागच्या कराटेपटूंनी केलेली कामगिरी निश्‍चितच कौतुकास्पद आहे. कोरोना काळातही या सर्वांनी न चुकता नियमित प्रशिक्षण घेतले.यामध्ये त्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य मोलाचे ठरले.

– राहूल तावडे, प्रशिक्षक
Exit mobile version