अलिबागला पोलीस स्मृतीदिनाचे आयोजन

| अलिबाग । वार्ताहर ।
पोलीस अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजाविताना आपल्या प्राणांची बाजीही लावतात. काहीजण आपल्या प्राणांची आहुतीही देतात. त्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ गुरुवारी (दि.21) सकाळी 8 वा.पोलीस मुख्यालय अलिबाग येथे शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली देऊन स्मरण करण्यात येणार आहे. यावेळी डॉ.महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. तरी याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version