अलिबाग तालुक्याची कोरोना मुक्तिकडे वाटचाल

Corona Viruses against Dark Background

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात रविवार 20 मार्च रोजी कोरोनाच्या एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही तर तालुक्यात फक्त एकच रूग्ण असल्याने अलिबाग तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याने दिलासा मिळत आहे. एकमेव रूग्ण बरा झाल्यानंतर आणि नवीन रूग्ण आढळला नाही तर अलिबाग तालुका शून्य रूग्ण होवून कोरोना मुक्त होवू शकतो.
आजपर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 239 झाली आहे. यापैकी 629 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 22 हजार 609 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील एका पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version