। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
नाशिक बार असोसिएशन, स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन, नाशिक जिल्हा अॅडव्होकेट्स क्रिकेट अॅण्ड स्पोर्टस् असोसिएशन व महाराष्ट्र अॅडव्होकेट क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे राज्यस्तरिय अॅडव्होकेट्स लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही रविवारी (दि. 26) सुरु झाली असून 2 जानेवारी 2021 पर्यंत आयोजित केली आहे. या क्रिकेट स्पर्धे करिता अलिबागच्या वकिलांचा संघ देखील सहभागी झाला आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 78 संघांनी सहभाग घेतला आहे. अलिबाग संघ दर वर्षी अंतिम 8 मध्ये स्थान पटकवतो. ह्या वर्षी अलिबाग संघाचे नेतृत्व अॅड. महेश म्हात्रे करत आहेत. कोरोना निर्बंधांचे सर्व नियमांचे पालन करुन हि स्पर्धा राबवली जात आहे. स्पर्धा व्हाईट बॉलवर खेळविली जाणार आहे. ही स्पर्धा केवळ वकिलांसाठी आयोजित केली आहे. बाहेरील लोकांना सहभागी होण्याची परवानगी नाही आहे.
अलिबाग वकिलांचा संघ
महेश सुहास म्हात्रे (कर्णधार), गौतम प्रमोद पाटील, रुषिकेश माळी, रुग्वेद ठाकूर, प्रशांत म्हात्रे, कौस्तुभ पुणेकर, प्रशांत गावंड, समीर बंगाली, राहुल मोरे, रोहित भोईर, स्नेहेंद्र पवार, मनीष पाटील, गौरव लेले