अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग शहरात महिलेच्या कार्यालयात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणातील आरोपीस अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, अलिबाग शहरातील महिला काम करत असून मागील तीन महिन्यासून आरोपी या महिलेचा वारंवार पाठलाग करुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. काल बुधवारी दोन अनोळखी इसमांसोबत सदर महिलेच्या ऑफिसमध्ये घुसून ऑफीसचा दरवाजा बंद करुन दरवाजाजवळ दोन अनोळखी इसमांना थांबवून ठेवले. आरोपीने फिर्यादीशी अश्लील चाळे करीत मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. महिलेल्या तक्रारीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कावळे करीत आहेत.