अलिबागचा कलाकार करणार विदर्भात धमाल

| अलिबाग | वार्ताहर |

रायगड भूषण विनोदी कलाकार म्हणून ओळख असलेला कलाकार योगेश पवार याला नागपूरमध्ये 13 जून रोजी होत असलेला ‌‘विदर्भ गौरव पुरस्कार’ समारंभासाठी प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केले गेले आहे. त्यासोबतच अनेक सेलेब्रिटी, नेते, कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.हा कार्यक्रम विर शिव छत्रपती संघटना नागपूर आणि प्रॉडकशन व न्यूज इंडिया 24 यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्वावान व्यक्तींना विदर्भ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Exit mobile version