। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 1493 पैकी 1181 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. टक्केवारीनुसार 79.10 टक्के मतदान झाले आहे.
अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागांपैकी 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 11 जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 13, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांसाठी 6, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी 3 तर हमाल/मापारी मतदार संघात महविकास आघाडीचा बिनविरोध उमेदवार निवडून आला आहे. 29 एप्रिल रोजी सायंकाळी मतमोजणी करण्यात येणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.