। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहरांमध्ये बेकादेशीररित्या गुटखा व इतर अमली पदार्थांचे विक्री करणाऱ्या तिघांविरोधात अलिबाग पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
अलिबाग पोलिसांची शनिवारी (दि. 28) सकाळी अलिबाग एसटी स्टँडच्या परिसरात नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी एक संशयित परिसरात फिरत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे गुटखा सापडला. शहरातील शिवलकर नाका येथील एका पान टपरीमध्ये त्याने गुटखा दिल्याची कबुली दिली. अलिबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन छापा टाकला असता अवैध गुटखा, भांगेच्या गोळ्या, देशी-विदेशी दारूचा साठा आढळून आला. याप्रकरणी
जयप्रकाश पटेल व यश नागवेकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .






