अलिबागच्या कराटे पट्टूंची सुवर्ण कामगिरी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पनवेल येथे झालेल्या कराटे स्पर्धेत अलिबागच्या कराटे पट्टूंनी सुवर्ण कामगिरी बजावली आहे. ऑल इंडिया ओपन इंविटेशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये अठरा स्पर्धकांनी सहभाग घेऊन अनेक पदके मिळवून अलिबाचे नाव लौकीक केले आहे.

पनवेल येथील वीरूपक्ष मंगल कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या ‘ऑल इंडिया ओपन इंविटेशनल कराटे चॅम्पियनशिप 2024’ मध्ये अलिबागच्या 18 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धकांनी कटा व कुमिते या दोन्ही विभागात सहभाग घेत पदकांची लूट करून यशस्वी कामगिरी बजावली आहे. यामध्ये मुमूक्ष घरत, सार्थक मोरे यांनी सुवर्ण, रज्जाक मुजावर यांनी रजत व सुवर्ण, दक्ष पाटील याने कांस्य व सुवर्ण, लव्या घाडगे याने सुवर्ण व रजत, तनिष्क तावडे याने रजत, आयुष अंबाडे याने कांस्य व रजत, मिहीर वर्तक याने कांस्य व रजत, अस्मित थळे याने कांस्य व रजत, मदयान कादिरी याने दोन रजत, ध्रुव शहा याने दोन रजत, तुबा गोंडेकर याने रजत पदक तर, दूर्वा भगत, आरव प्रजिश, स्वर शहा, रुही ठाकूर, आदित्य चोरघे, श्रीयांस तावडे यांनी कांस्य पदक पटकावले आहे. या स्पर्धकांना प्रशिक्षक राहुल तावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सर्व स्पर्धकाचे अभिनंदन होत असताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

Exit mobile version