| बांदा | प्रतिनिधी |
न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा येथील विद्यार्थिनी अलिशा गावडे हिने विभागीय शालेय हँडबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. तिची बदलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्यस्तरावर स्थान मिळवणारी अलिशा ही एकमेव मुलगी ठरली आहे. विभागस्तर खेळाडू निवड चाचणीत अलिशाने प्रभावी कौशल्य सादर केले. तिला क्रीडा शिक्षक महेश नाईक, लवू बांदेकर यांचे मार्गदर्शन लाभले. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापिका सायली परब यांनी तिचे अभिनंदन केले.







