| मुंबई | प्रतिनिधी |
आता सर्व 274 आमदारांच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या निवडणुकीत पराभूत होणारा 12 वा उमेदवार कोण, याची सर्वांना उत्सुकता लागली असून 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विजयासाठी 23 मतांचा कोटा लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला मतमोजणीसाठी परवानगी नियमानुसार घेतली जाणार आहे. सर्व 274 आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून आता काही मिनिटात निकाल लागणार आहे.