ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट माथाडी अ‍ॅन्ड जनरल कामगार युनियने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली साहित्य वाटप

। महाड । वार्ताहर ।

राज्याच्या विविध भागातल्या पूरस्थितीमुळे तेथील रहिवाशांचे जीवन उध्वस्त करून टाकले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे. सरकारने देखील पुरामुळे नुकसान झालेल्या भागांमध्ये सर्वोतोपरी मदत केली आहे. तालुक्यातील परिस्थितीवर नुसतीच सहानभूती दाखवून चालणार नाही, याकरीता प्रत्येकाला खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत करणे गरजेचे आहे. दरम्यान अशा नाजूक प्रसंगी दक्ष नागरिक संस्था आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट माथाडी अ‍ॅन्ड जनरल कामगार युनियन यांनी जास्त वेळ न दवडता महाडमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. जिथे कुठलीच मदत पोहचली नव्हती अशा महाड बाजारपेठ, भीमनगर आदी ठिकाणी जाऊन एकूण 150 कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. खचलेली भिंत, विझलेली चुल आणि त्या निष्पाप डोळयातलं पाणी पुसत तेथील बांधवांना आधार दिला.
यावेळी युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी, राष्ट्रीय सरचिटणीस श्रेयस ठाकूर, महाराष्ट्र उपाध्यक्ष भूषण निकम, कुमार नागपाल, संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते राज सदावर्ते, खजिनदार निलेश भगत,अब्बास शेख, व इतर सदस्य उपस्थित होते. तसेच कृषीवलचे पत्रकार जुनेद तांबोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही कठीण वेळ आहे, ज्यात माणसाला माणसाने मदत करून माणुसकी दाखवणे आवश्यक आहे. याचप्रकारे दक्ष नागरिक संस्था आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट माथाडी अ‍ॅन्ड जनरल कामगार युनियन यांनी माणुसकीच्या नात्याने एक हात पुढे करून दिलगिरी व्यक्त केली.

Exit mobile version