| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे इंडिगो एअरलाइन्स कंपनी अडचणीत सापडली आहे. इंडिगोने शुक्रवारी ही देशभरातील शकडो विमान उड्डाणं रद्द केली आहेत. दिल्ली विमानतळावरील इंडिगोची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे विविध विमानतळांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम झाला आहे. याआधीही इंडिगोची 500 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली होती.
विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आज मध्यरात्री 11.59 वाजेपर्यंत एअरलाइनची सर्व उड्डाणं रद्द राहतील. या समस्येचं निराकरण करण्यासाठी ग्राऊंड टीम सर्व भागीदारांशी चर्चा करत आहोत. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खंत आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सवाल उपस्थित केला. त्यांनी म्हटलं आहे की, इंडिगोचं अपयश हे या सरकारच्या मक्तेदारी मॉडेलचा परिणाम आहे. पुन्हा एकदा सामान्य भारतीयांना विलंब, उड्डाणं रद्द करणे आणि असहाय्यतेच्या रूपात किंमत मोजावी लागली आहे.
दिल्लीतून इंडिगोची सर्व विमाने रद्द
