भाजपच्या तालुका अध्यक्षाची जिरविण्यासाठी सर्व पक्ष एकत्र

| पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील खारेपाटातील प्रतिष्ठेची व मानाची समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे वाशी ग्रामपंचायत. या वाशी ग्रामपंचायतीमध्ये भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील यांची आरेरावी मोडून काढतानाच त्यांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत.

शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे एकत्र आल्याने त्यांची ताकत वाढली आहे. त्यातच भाजपचे काही कार्यकर्ते देखील श्रीकांत पाटील यांच्या हम करो सो कायद्याला कंटाळून सोबत आले आहेत. शेकापक्षाचा एक गट भाजपमध्ये सामील झाला होता. परंतू श्रीकांत पाटील यांनी त्याच गटाची राजकीय कारर्किद उद्वस्त करायला घेतल्याने या गटाने देखील आपली स्वतंत्र चुल मांडली असून त्यांनी सर्व पक्षीय गटात आपली हजेरी लावली आहे. नवीन भाजपला संपवण्याच्या दृष्टीने श्रीकांत पाटील यांनी आपल्याच भाजपच्या काही व्यक्तींना अपक्ष म्हणून उभे करण्याचा घाट घातला होता. परंतू त्यांचा हा कावा लक्षात येताच सर्व पक्षीय एकत्र आले आणि भाजपचा एक गट वेगळा झाला आहे. श्रीकांत पाटील हे त्यांच्याच वरिष्ठ नेतृत्वाचे ऐकत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये नवा जुना वाद उफाळून येऊन भाजपचे दोन तुकडे पडल्याचे चित्र आहे.

Exit mobile version