2 मेला अर्बन बँकेसाठी सर्वपक्ष एकात्र

। पेण । वार्ताहर ।
23 सप्टेंबर 2010 ला पेण अर्बन बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले आणि रायगडसह मुंबईमध्ये 18 शाखा असणारे 75 वर्ष जूनी बॅक आर्थिक दिवाळखोरीत जाऊन 12 वर्ष उलटून गेली. परंतू आजही बँकेचे ठेवीदार पैसे मिळतील या आशाने जगत आहेत. बॅक बुडविणारे शिशिर धारकर हे उजळ माथ्याने फिरुन पेण नगरपालिका निवडणूकीच्या बाबत वेगवेगळे वक्तव्य करुन सध्या पेणमध्ये गटातटाचे राजकारण करुन बॅक आर्थिक घोटाळया संबंधात वेगवेगळे जावई शोध लावून बेशुटपणे आरोपांच्या फैरी झाडत आहेत. कधी गीताबाग बंगल्यावर तर कधी वैकुंठ बंगल्यावर आपला खरा चेहरा लपविण्यासाठी धारकर यांनी प्रामाणिक काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर देखील तोंडसुख घेण्याचा प्रयत्न करत बॅक कर्मचार्‍यांनी बुडविली असेही वक्तव्य एकदा प्रसार माध्यमांन समोर केले. खरच अर्बन बँकेमध्ये कर्मचार्‍यांची भ्रष्टाचार करण्याची हिंमत होती का? त्यांना कुठल्या कागदावर सही करण्याची मुभा होती? असे असताना अधिकारी वर्ग बॅक कशी बुडवितील हा संशोधनाचा विषय आहे. ही धारकरांची बनवाबनवी पेणकरांच्या लक्षात येताच सर्व पेणकरांनी एका व्यासपिठावर यायचे ठरविले आहे. अशी माहिती प्रसार माध्यमांन समोर नरेन जाधव यांनी दिली.त्यानी सांगितले की, 12 वर्षापूर्वी दर महिन्याला धारकर 50 लाख रुपये जमा करणार होता. अशाप्रकारची जाहिरात देखील वृत्तपत्रांमध्ये छापून आणली होती. तर तत्कालीन सहकार मंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यामध्ये 40 लाख रुपये भरणार असल्याचे लिखित आश्‍वासन दिले होते. 12 वर्षापूर्वी देखील धारकर यांनी बनवाबनवी केल्याचे यावरुन उघडकीस येत आहे. आता देखील बनवाबनवीचेच खेळ सुरु केले आहेत. त्यामुळे बॅक बुडव्या धारकरावर कोर्टाचे अपमान केल्याचे प्रकरणी देखील गुन्हाची नोंद व्हावी जेणेकरुन चुकीची माहिती लोकांमध्ये पसरवून दिशाभूल करता येणार नाही अशी माहिती प्रसार माध्यमांना खातेदार ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्याक्ष नरेन जाधव यांनी दिली. त्यांनी हेही पुढे सांगितले की, 2 मेला आंदोलनासाठी सर्वपक्ष एकत्र येऊन हुतात्मा भाई कोतवाल चौकात धरणे आंदोलन करणार आहेत. पेण शासकिय विश्रांती गृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेसाठी नगरसेवक अजय क्षिरसागर व मोहपाडयाचे ठेवीदार वैद्य म्हणून उपस्थित होते.

Exit mobile version