आदीवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप

। रसायनी । वार्ताहर ।

खालापूर तहसील कार्यालय व वासांबे मोहोपाडा तलाठी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील आदीवासी बांधवांसाठी जातीचे दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तिनशे आदीवासी बांधवांनी फार्म भरुन जमा केले होते. या दाखल्यांचे वाटप गुरुवारी वासांबे मोहोपाडा आदीवासी वाडीत करण्यात आले. आदीवासी बांधवांना जातीचे दाखले मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे वातावरण दिसून आले. याप्रसंगी भाग्यश्री पवार, ताई पवार, शितल मंदाडे, रविंद्र गायकवाड, पुंडलिक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version