| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यातील वाशी हवेली हे आदर्श गाव म्हणून पुढे येत आहे. ग्रामपंचायत वाशी हवेली 15 वा वित्त आयोगाच्या निधी मधून 250 कुटुंबांना प्रत्येकी 20 लिटर चे दोन डस्टबिन ओला व सुका कचरा आणि 10 लिटर चे पिण्याच्या पाण्याचे फिल्टर वाटप करण्यात आले. यातून स्वच्छतेकडून आरोग्याकडे जाण्यासाठी गावाचे प्रयत्न आहेत.
संत तुकडोजी महाराज ग्राम पुरस्कार जिल्हा परिषद गट यातील 50000 रूपयाचे प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी वाशी हवेली गावाचे नाव घोषित करण्यात आले आहे आणि पुढील 2022-23वर्ष साठी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार साठी तयारी करणार असल्याचे वाशी हवेली चे युवा सरपंच जगन्नाथ तांडेल यांच्या कडून सांगण्यात आले. सरपंच जगन्नाथ तांडेल यांनी गावातील प्रत्येक नागरिकाने ओला व सुका कचरा कसा वेगळा करायचे याबाबत सांगितले. सगळ्यांनी स्वच्छता करण्याचा निर्धार केला आहे. स्वदेस फाउंडेशन चे समन्वयक सागर पाटील यांनी प्रत्येक नागरिकाने आपले घर आपले गाव कसे स्वच्छ राहील तसेच दर दिवशी गावातील 10 लोकांनी पाळी लावून गाव स्वच्छ केले तर कायमस्वरूपी गाव सुंदर आरोग्याने समृद्ध राहिल असे मार्गदर्शन केले. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य,ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.