महिलांसाठी शिलाई मशीन वाटप

| रेवदंडा | वार्ताहर |

चौल ग्रामपंचायतमधील महिलांसाठी बचत गटाच्या महासंघास शिलाई मशीन वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून महिलांसाठी बचत गटाच्या महासंघास शिलाई मशीन वाटप कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी सुरेंद्र म्हात्रे, प्रतिभा पवार, अजीत गुरव, रूपाली म्हात्रे, अजीत गुरव, ॠतिका पाटील, संचिता भोईर, माधवी टेकाळकर, यावेळी मोठया संख्येने चौलमधील बचत गटाच्या महिलांची उपस्थिती होती. यावेळी चौल ग्रामपंचायतीच्यावतीने निलेश गुरव, मनिषा राणे, दिनेश शिंदे, निशांत म्हात्रे, मनोज ठाकूर, संपदा पिळणकर या कर्मचारीवर्गानी विशेष परिश्रम कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी घेतले.

Exit mobile version