दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर वाटप

। नेरळ । वार्ताहर ।
नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्टच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील वडवली येथील जिल्हा परिषद शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्याला व्हीलचेअर भेट देण्यात आली. सार्थक सावंत हे बालक व्यंग असल्याने शाळेतील दिलीप घुले यांच्या शिफारशीनुसार व्हील चेअर देण्यात आली. साई ट्रस्टकडून तालुक्यातील आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांना गेली 10 वर्षे मदत करण्याचे कार्य सुरु आहे. सार्थक सावंत या विद्यार्थ्यांबद्दल वडवली शाळेचे मुख्याध्यापक परचुरे यांनी माणगाव तर्फे वरेडी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घुले यांना माहिती दिली.

घुले यांनी त्याबाबत श्री साई ट्रस्ट कडे प्रस्ताव ठेवला आणि ट्रस्टकडून व्हीलचेअर उपलब्ध करुन दिली. यावेळी ट्रस्टच्या नवी मुंबईच्या संचालिका राधिका घुले, वडवली शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक, शाळेचे मुख्याध्यापक पाचपुते तसेच शिक्षक गांजाळे हे उपस्थित होते.़

Exit mobile version