नववर्षाच्या स्वागतासाठी वावोशी महिला मंडळाची लगबग

। खोपोली । प्रतिनिधी ।
मराठी वर्षाचा प्रारंभ होणारा दिवस म्हणजे गुढीपाडवा. या सणाच्या स्वागतासाठी वावोशी गावातील महिला जोरदार तयारीला लागल्याचे दिसत असून, गावातील रस्ते व त्या बाजूची स्वच्छता, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला चुण्याची रांगोळी, मंदिर परिसराची स्वच्छता यासह प्रत्येक घराच्या आसपासची स्वच्छता करत वावोशी गावातील सर्व महिलांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. या महिलांनी गुढीपाडव्याच्या स्वागतासह पुढे येणार्‍या राम नवमीच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू केल्याने सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
वावोशी गावात रामाचे मंदिर असून, या ठिकाणी सालाबादप्रमाणे राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षी हा उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने संपन्न झाला. मात्र, यंदा कोरोनाचे संकट टळल्याने तसेच शासनाने सर्व निर्बंध हटविल्याने यंदाचा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साही वातावणात संपन्न करण्याचा ध्यास येथील महिलामंडळाने घेतल्याचे दिसत आहे.

Exit mobile version