शेतीबरोबरच जोडधंदा आवश्यक- पवार

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

विकास होत असला तरी त्या कामात शेतजमीन जात आहे. त्यामुळे केवळ शेतीवर निर्भर न राहता जोड धंदा आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेच्या इमारत उद्धटनासाठी ते नवी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी कामगारांचा मुंबई प्रवास सांगत तरुण पिढीने आव्हाने स्विकारण्यास तयार राहण्याचा सल्ला दिला.

शेतीवरचा भार कमी करून दुसर्‍या व्यवसाय हे कसे होतील या संदर्भात सरकारने विचार केला पाहिजे. गिरणी कामगारांचा संप झाला. संपाला विरोध नाही पण व्यवसाय संपेपर्यंत संप केला गेला तो संप संबंधीत कामगार नेत्याने जास्त वेळ चालवल्याने गिरणी कंपन्या बंद पडल्या. 120 गिरणी मिल बंद पडल्याने संसार उध्वस्त झाले. कामगार देशोधडीला लागले. मात्र पुढची पिढी उभी राहिली, असे म्हणत पवार यांनी मुंबईतील कामगार इतिहास कथन केला. शेतकर्‍यांनी नाविन्याचा स्विकार करणे आवश्यक आहे हे सांगताना त्यांनी नाशिक येथील अनुभव सांगितला. नाशिकला गेल्यावर तेथे द्राक्ष उत्पादक शेतकरी बैठक झाली. त्यात विदेशी द्राक्ष बियाणे लावण्याचा निर्धार केला. नवीन जात आली आहे. यावर पाऊस, थंडी, ऊन याचा फारसा परिणाम होत नाही. त्याचे त्यांनी कौतुक केले. भारतातून फळे मोठ्या प्रमाणात निर्यात होतात मात्र काही नियमात बदल झाल्याने निर्यात घटली. या साठी केंद्र राज्य ते शेतकरी संवाद आवश्यक असल्याचे त्यांनी सांगत बांग्लादेश मोठ्या प्रमाणात फळ निर्यातीवर भर देत असल्याची माहिती दिली.

आज 56 टक्के लोक शेती करतात. बाकीचे लोक इतर व्यावसाय , नोकरी करतात शेतीवरील बोजा कमी केला पाहिजे..आता लोकसंख्या वाढूनही जमीन कमी आहे.. नवी मुंबईत भात शेती होती. आता शहर झाले. नागपूर संमृध्दी मार्गात शेतीची जमीन गेली. कारखानदारी वाढली.

शरद पवार, खासदार

गायीला मिठी नकोच
भाषणात पवार यांनी राजकारण विषय कटाक्षाने टाळला मात्र कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी व्हॅलेंटाईन डे बाबत केंद्राच्या निर्णयाबाबत मिश्किल भाष्य केले. गाईला मिठी मारण्याचा आदेश आज परत घेतलाय. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्राला चांगलं पत्र लिहिलं, त्यांनी केंद्राला चिंता व्यक्त केली. व्हॅलेंटाईन डे ला गायीला मिठी मारायला गेलो तुम्ही लाथ मारली तर माझं कपाळ फुटेल, आणि पुढून मिठी मारल्यावर गाईने शिंग मारली तर ते माझ्या पोटात जाईल, त्यातनं आमची सुटका करा. सध्या हा आदेश मागे घेतला हे बरे झाले.

Exit mobile version