राजकारणाबरोबरच सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातही शेकापने बांधिलकी जोपासली

। महाड । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्ष हा केवळ राजकारण करीत नसुन सामाजिक, सांस्कृतिक बांधीलकी जोपासणारा पक्ष असून समाजातील तळागाळातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कष्टकरी कामगार, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार, शिक्षण महर्षी, जे.बी.सावंत, शैक्षणिक संस्थेचे चेअरमन नानासाहेब सांवत यांनी शेकाप माणगावतर्फे तयार करण्यात आलेल्या आरतीसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात केले. या आरती संग्रह प्रकाशन समारंभाला शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील, रायगड बँकेचे संचालक अस्लमभाई राऊत यांनी दुरध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या. शेकापचे कार्यालयीन चिटणीस राजेश कासारे यांनी प्रास्तविकांमध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन माणगावमधील वाकडाई नगर येथील तरुण विनायक कदम याने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. नानासाहेब सावंत यांनी शेतकरी कामगार पक्ष केवळ राजकारण करीत नसून सर्व सामान्यांच्या सुख आणि दुखा:त सहभागी असणारा पक्ष आहे, सामाजिक, सांस्कृतिक बांधिलकीची जपणुक करणारा पक्ष आहे असे सावंत यांनी म्हटले. सभापती संजय पंधरे यांनी निलेश थोरे यांच्या कार्याचे कौतुक केले. पक्षाचे उपक्रम राबिवण्यात येतात त्या उपक्रमांना त्यांचे सहकार्य नेहमीच असते. शेकाप हा केवळ निवडणुकी पुरता कार्यरत न राहाता सतत जनतेची सेवा करीत असतो. कोरोना काळात निलेश थोरे रुग्णांच्या घराघरामध्ये जाऊन त्यांना जेवण, ओैषधे देण्याचे काम कौतुकास्पद आहे. तसेच महाड पोलादपुर तालुक्यांमध्ये उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमध्ये मदतीकरीता यांनी अहोरात्र काम केले. थोरे हे सर्व सामान्यांकरीता धावून जाणारे निस्वार्थी कार्यकर्ते आहेत.

Exit mobile version