माजी विद्यार्थ्यांचा सोहळा उत्साहात

| कोलाड | वार्ताहर |
येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवे-कोलाड संस्थेचे ट्रस्टी, संदीप तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 12 मार्च रोजी माजी विद्यार्थ्यांचा सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रा. नेहल प्रधान, कार्यालयीन अधीक्षक अमोल गॉलिपकर, सांस्कृतिक विभागाचे प्रा. कीर्ती राधाकृष्णन, महिला कक्षाचे प्रा. अडलीकर जयवंती, विज्ञान विभागाचे प्रमुख शेळके रेश्मा, कला विभागाचे प्रमुख डॉ. सतीश सावळे, अजिवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. अमलपुरे सूर्यकांत आधी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश जाधव यांनी, तर आभार प्रा. अडलीकर जयवंती यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली

Exit mobile version