| कर्जत | वार्ताहर |
अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी राज्यभरातून माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. दिवसभर आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा सर्वांनीच आस्वाद घेतला. संस्था कधीही अडचणीत आली तर आम्हाला हाक मारा, असा शब्द माजी विद्यार्थ्यांनी दिला. यावेळी नवनीत प्रकाशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश शहा यांच्या हस्ते माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गणेश वैद्य, श्रीराम पुरोहित, नंदकुमार मणेर, पद्माकर गांगल, रणजीत जैन, विजय मोरे, संजय खडे व्यासपीठावर उपस्थित होते.