सारळ विद्यामंदिराच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव

शाळेला दिली लोखंडी गेट आणि वर्ग खोल्यांची भेट

| रायगड । प्रतिनिधी ।

शाळेचा सुट्टीचा दिवस परंतु रविवार असूनही सारळ माध्यमिक विद्यामंदिराचापरिसर गजबजला होता. शाळेच्या फलकावर माजी विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव असे सुलेखनीय अक्षरात लिहिले होते. माजी मुख्याध्यापकांसहशिक्षकांचे डोळे शाळेच्या पटांगणाकडे लागलेले. काहीवेळातचपटांगणात शास्त्रज्ञ, लोकप्रतिनिधी, कलाकार, बँक व्यवस्थापक, अभियंते, शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि शिक्षक असे विविध क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असणारे चेहरे दिसले एकमेकांच्या चेहर्‍याकडे पाहून टोपणनावाने बोलण्यास सुरुवात झाली. अन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तेव्हा चित्र स्पष्ट झाले. शैक्षणिक वर्ष 1993 – 94 मधील इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी आनंदोत्सवाचे आयोजन केले आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण होऊन तीस वर्ष उलटूनही शिक्षकांनी मात्र विद्यार्थ्यांना बरोबर ओळखून आशीर्वाद दिला.

शैक्षणिक वर्ष 1993 – 94 मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी धकाधकीच्या जीवनात चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचताना आयुष्याच्या अवघड वळणावर आनंदाचे क्षण साठविण्यासाठी सारळ माध्यमिकि वद्यामंदिरात माजी विद्यार्थ्यांचा आनंदोत्सवाचे आयोजन केले होते. नेहमी वर्गात पुढाकार घेणार्‍या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सवाची तयारी करून माजी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना निमंत्रित केले होते. गेट टुगेदर आहे समजल्यावर वर्गातील पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकावर बसणारे विद्यार्थ्यांनी आनंदोत्सवाला आपली हजेरी लावली. यामध्ये अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील, गिरीश पाटील, गिरीश कडवे, रेखा ठोमरे, वीरेंद्र वर्दे, देवेंद्र पाटील, मच्छिंद्रकडवे, जयवंत कोळी, अल्पेश कडवे, संदेश पाटील, तुळशीदास नाखवा, सचिन पाटील, योगेश पाटील, महेश पेडवी, जितेंद्र वार्डे, गणेश ठोमरे, महेश पाटील, शीतल कुठे, स्वाती पाटील, शीतल पिंपळे, रेखा कडवे, विराज पाटील, मनोज राणे, नेत्र पाटील, शर्मिला पाटील, सुशील भोसले, राखी जैन आदी माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनीशाळेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला लोखंडी गेटची भेट दिली. या गेटचे लोकार्पण यावेळी माजी शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर प्रकाश पाटील, संतोष पाटील, आणि गिरीश पाटील या माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांतून शाळेला दोन वर्ग खोल्या बांधून देण्यात आल्या आहेत.

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून शाळेप्रतीच्या भावना व्यक्त करताना शिक्षकांचे ऋण व्यक्त केले. शालेय जीवनात अल्हड असणारे मन आणि तारुण्याच्या वाटेवर जाताना दाखविलेला यशाचा मार्ग, मिळालेले शैक्षणिक ज्ञान, व्यक्तिमत्व विकासाचे दिलेले धडे स्पर्धेच्या युगात टिकून यश संपादन करण्यासाठी आधार ठरले आहेत. शिक्षणाचे धडे गिरवताना शिक्षकांनी दिलेला मार आणि केलेली कान उघाडणी यामुळेच विविध क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी नावलौकिक मिळवत आहेत. 1993- 94 च्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांचा विचार केला तर या वर्गातील उपस्थित असणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये अभियंता, शिक्षक, शास्त्रज्ञ, शासकीय कर्मचारी आणि यशस्वी लोकप्रतिनिधी घडले आहेत. असे मनोगतातून सांगताना शिक्षकांचे आभार मानले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक चेतना राणे, विनोदिनी तेंडुलकर, पांडुरंग शिंदे, बापूसाहेब माळी, दत्तात्रेय माने, दत्तराज यावलकर, जगदीश पाटील, निलेश पाटील, सुनील जाधव, विष्णू पाटील, जयेंद्र घोसाळकर, प्रदीप पवार, मधुकर पाटील, हितेंद्र पाटील, प्रीती जैन ज्योत्स्ना चौगुले, भरती पाटील, कृष्ण पाटील, अजित पाटील, प्रीती कांबळे यांना शिरसाष्टांग दंडवत घालून आशीर्वाद घेतले.

Exit mobile version