माजी विद्यार्थ्यांनी अनुभवले जुने क्षण

| चोंढी । वार्ताहर ।

सकाळी दहा साडे दहाची वेळ झाली आणि 1988 साली दहावी झालेले वडके विद्यालय चोंढी किहीमचे माजी विद्यार्थी दातारवाडीमध्ये जमा झाले. दोन चार नव्हे तर अर्धा वर्गच जमा झाला होता. निमित्त होते होते माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे. व्हॉटसअँपच्या माध्यमातुन गेले चार पाच वर्ष हा ग्रुप एकत्र येतो आणी गेट टूगेदर साजरा होतो.

36 वर्ष उलटून गेली तरी तोच खोडकर पणा मज्जा मस्ती गप्पा टप्पा यांनी दातारवाडी किहीम फुलून गेली होती. साधारण 11 ते 1 वाजे र्यंत मस्त फनी गेम्सचे आयोजन केले होते. त्यामध्ये स्ट्रॉने थर्माकोलचे गोळे पकडणे रहा सारखे लहान मुलांचे खेळ झाले. बर्फाचे गोळे खाऊन झाले. दरवर्षी दोन शिक्षक बोलवून त्यांचा सत्कार केला जातो. तसे यंदा शारीरिक शिक्षणाचे शिक्षक शांताराम राऊत आणि कार्यालयीन कामकाज पाहणारे भिडे यांना आमंत्रित करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा आणी मनातल्या काही अडचणी आणि आठवणींना वाट फुटावी. यासाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ठाणे, मुंबई, विरार, खेड, चिपळूण आणि अलिबागचे माजी विद्यार्थी जमले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन निलेश काठे तर नियोजन भोईर, वावेकर यांनी केले.

Exit mobile version