। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकिय व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे, बुध्द धम्माच्या प्रचार व प्रसार कार्यात स्वत:ला झोकून देणारे बौद्धजन हितसंरक्षक समिती 27 गाव विभाग शिरवली या धम्मसंघटनांचे जेष्ठ कार्यकर्ते, कळंबट गावचे सूपूत्र रामचंद्र तानाजी गमरे यांचे अल्पशा दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण चिपळूण तालुका शोकाकूल झाला आहे.
त्यांच्या पाश्यात पत्नी सविता, भाऊ शांताराम, पूतणे नितीन, विशाल, सतिष, मुले संदिप, दिलीप, अजित, प्रदिप, मुली, दिपाली, विशाखा, जावई दिपक कदम, चंद्रमणी जाधव, नातवंडे प्रमोद, प्रणीत, प्रणाली असा मोठा परिवार आहे.
आंबेडकरवादी रामचंद्र गमरे कालवश
