आंबेतला तालुक्याचा दर्जा मिळावा – अंकुश खडस

| आंबेत | वार्ताहर |

आंबेत गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा या करीता सभागृहात निर्माण संघर्ष कृती समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होत. यावेळी परिसरातील नागरिकांसह इतर वरिष्ठांची उपस्थिती लाभली होती.

माजी मुख्यमंत्री स्व बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी आंबेत हे गाव तालुक्याचे ठिकाण करण्यासाठी त्यांच्या मंत्री कारकिर्दीत शासनस्तरावर प्रयत्न केले होते. मात्र बॅ अंतुले यामध्ये मंत्रिमंडळाच्या कोर कमिटीतून पायउतार झाल्यानंतर त्यांना पुढे शक्य झाले नाही मात्र त्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्णत्वास आणण्याकरिता म्हसळा तालुक्यातील समाजसेवक अंकुश खडस यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्‍वभूमीवर रविवारी आंबेत शेतकरी सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

Exit mobile version