आंबेवाडी ग्रामस्थांचे स्थलांतरणासाठी आवाहन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात दरडग्रस्त गाव म्हणून आपत्ती व्यवस्थापन मध्ये नेरळ ग्रामपंचायत मधील आंबेवाडी गावाचा समावेश आहे. दरड कोसळण्याची स्थिती असल्याने आंबेवाडी मधील सर्व ग्रामस्थांचे स्थलांतरण करण्याची शिफारस आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे. ग्रामपंचायत कडून नोटिसा पाठवून देण्यात आल्यानंतर मात्र ग्रामस्थांनी गाव सोडण्यास नकार दिला आहे. ग्रामस्थांनी नेरळ ग्रामपंचायतला पत्र देऊन आपत्तीची स्थिती निर्माण झाल्यास आम्ही स्वतःच स्थलांतरण करू, असे आश्वासन दिले आहे.

आंबेवाडी या ठिकाणी वाडीच्या मागे असलेल्या माथेरान डोंगराचा भाग असलेल्या भागाची पाहणी केली. आंबेवाडीची पाहणी केल्यांनतर आपत्ती व्यवस्थापन समितीने त्या ठिकाणचे 31 कुटुंब यांचे स्थलांतरण करण्याची सूचना नेरळ ग्रामपंचायत यांना केली आहे. तेथील 250 कुटुंबांना स्थंलातरण करून मोहाचीवाडी येथील साई बाबा संस्थान, तसेच नेरळ गावातील धारप सभागृह येथे जाण्यास सांगितले आहे. स्थिती आणि त्या घरामधील मौल्यवान वस्तूंची भीती असल्याने घरे सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही स्वतः गावकरी गाव खाली करून प्रशासन सांगेल तेथे राहायला जाऊ, अशी विनवणी करणारे पत्र नेरळ ग्रामपंचायतला दिले आहे. त्या पत्रावर आंबेवाडी मधील 34 ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

त्यात मनोहर दरवडा, सुनील निर्गुडा, देहू निर्गुडा, हरचनांद्रा दरवडा, बाळू निर्गुडा, काशिनाथ निर्गुडा, देहू दरवडा, मालू दरवडा, अजय सदा निर्गुडा, नामा पारधी, बाळू पारधी, हेमंत ठाकरे, राघो उघडा, गणेश दरवाढ, देहू दरवडा, करण दरवडा, पांडुरंग दरवडा, अशोक दरवडा, मुक्या सावंत, पुंडलिक दरवडा, किसान उघड, आलू पारधी, नारायण पारधी, बाळू दरवडा, गोविंद दरवडा, अरुण दरवडा, नितीन दरवडा यांच्या सह्या आहेत.

Exit mobile version