| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पालीतील अंबीके कुटुंबियांनी घरगुती गणपती सजावटीतून पर्यावरणपूरक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. वारली चित्रकला माध्यमातून सर्व भारतीयांना अभिमानच क्षण म्हणजेच चांद्रयान मोहीम…. पण हीच मोहीम दाखवताना संस्कृती, कला यातील महाराष्ट्रातील वारली चित्रशैली घरगुती सजावटीमध्ये दर्शवली आहे.
आगमन गणरायाचे, स्वागत गणरायाचे करताना ही वारली कला आपली विविध पारंपरिक वाद्य जसे तारपा, ढोल घेऊन गणरायाचे स्वागत करताना त्रिमित चित्र लक्षवेधी वाटतात, त्यातच ही कला आपल्या भारतवासियांना अभिमान वाटणारा क्षण चांद्रयान-3 चे विशेष संदेश वारली नृत्यशैलीतून चांद्रयान चे महत्व अधोरेखित केले आहे. मंजिले क्या हे,रास्ता क्या हे,हौसला हो तो, फासला क्या है! असे संदेश देऊन ज्या शास्त्रज्ञांनी यासाठी आपले योगदान दिले त्यांची ओळख फोटो देखव्यातून दाखवून दिले आहे.
सजावटीचे सर्व साहित्य हे पर्यावरणपूरक आणि प्लास्टिक मुक्त आहे. दरवर्षी पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावटीतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असतो, यावर्षी वारली कला आणि चांद्रयान कलात्मकरित्या दाखवताना विशेष आनंद होत आहे असे राजेंद्र अंबीके यांनी सांगितले.