ढोकळेवाडी कबड्डी स्पर्धेत आंबिवली संघ विजयी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

गावदेवी नांदाई माता कबड्डी मंडळ ढोकळेवाडी यांच्यावतीने आदिवासी समाजाच्या जिल्हा स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन शनिवारी (दि.18) रोजी करण्यात आले होते.

या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघाने आपला प्रवेश नोंदविला होता. या स्पर्धेतील अंतिम लढत आंबिवली विरुद्ध आसनेवाडी या संघात झाली. दोन्ही संघाच्या खेळाडूने आपला बहारदार खेळ केला. शेवटी या स्पर्धेचा अंतिम विजयी आंबिवली हा संघ ठरला या संघास रोख रक्कम 10 हजार व आकर्षक चषक तर उपविजेता आसनेवाडी सुधागड या संघास रोख रक्कम 7 हजार व आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकांचा मानकरी उन्हेरे हा संघ ठरला यास रोख रक्कम 5 हजार व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांकावर कुंभारशेत या संघाला समाधान मानावे लागले या संघास रोख रक्कम 4 हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version