शेकडो हेक्टरवर दुबार पीक घेण्यात अडचणी
| मुरूड | वार्ताहर |
तालुक्यातील खार आंबोली धरणाचे पाणी शेतीपर्यंत पोहोचू न शकल्याने अनेक वर्षापासून भातशेती व्यतिरिक्त अन्य पिके घेण्यास शेतकरी धजावत आहेत. 2014 मध्ये राज्यभर जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करण्यात आली, परंतु आंबोली धरणावर अवलंबून उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम सात वर्षापासून बंद पडल्याने हजारो शेतकर्यांना कालव्याचे पाणी मिळालेच नाही.
पारंपरिक शेतीबरोबरच अत्याधुनिक तंत्राच्या मदतीने विविध पिके घेण्यासाठी सरकारकडून शेतकर्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी अनुदान, प्रशिक्षण, मार्गदर्शन कार्यशाळांचेही आयोजन केले जाते. शेती उत्पन्न वाढून शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावा, या त्यामागचा हेतू आहे. मात्र गेल्या सात वर्षांपासून आंबोली धरणातील कालव्याचे काम रखडल्याने मुरूड तालुक्यातील शेतकन्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले आहे.
600 हेक्टर जमीन ओलिताखाली
कालव्याचे पाणी मिळाल्यास तालुक्यातील तब्बल 600 हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याची शक्यता आहे. आंबोली धरणाचे लघुपाटबंधारे शेतकर्यांना पूरक व्यवसायाची प्रकल्पांतर्गत उजव्या डाव्या तीर कालव्याचे काम जून 2015 पासून बंद आहे. धरणाची पाणी साठवणूक क्षमता मोठी आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास बागायती, दुग्ध व्यवसाय व कृषी पर्यटनाला चालना मिळेल. शेतकर्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळेल आणि तालुक्याचा सरासरी आर्थिकस्तर उंचावेल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
मुरूडसह 12 गावांना पाणी
आंबोली धरण 2009 मध्ये बांधण्यात आले असून त्यासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करण्यात आला. स्थानिक शेतकर्यांना दुबार पीक घेता यावे, त्याचबरोबरच तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटावी, या उद्देशाने धरण बांधण्यात आले. मुरूडसह लगतच्या 12 गावांना धरणातून पाणी पुरवठा होतो. धरणाचे काम आंबोली धरण उजव्या तीर कालव्याचे काम 10 किमी प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत 6.1 किमी काम अपूर्ण आहे. तर डाव्या तीर कालव्याचे 2.64 किमी प्रस्तावित असून 1.64 किमी काम सात वर्षांपासून रखडले आहे. तालुक्यातील तब्बल 600 हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याची शक्यता आहे.
जमीन आणि खर्च
तालुक्यातील तब्बल 600 हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याची शक्यता आहे. आंबोली धरण 2009 बांधण्यात आले असून त्यासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करण्यात आला.
कालव्याच्या कामास सुधारित मान्यता, त्यानंतर कार्यादेश मिळेपर्यंत दोन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकल्प 123 कोटींचा असून भूसंपादनाचे 100 कोटींहून अधिक रकमेचे वाटप झाले आहे.
एस.डी. जाधव
कार्यकारी अभियंता, पेण
दुबार पीक घेता येत नसल्याने स्थानिक शेतकर्यांमध्ये नाराजी आहे. आंबोली धरणातील एकूण साठ्यापैकी 15 ते 20 टक्के पाणी पिण्यासाठी वापरले जाते. डावा तीर कालवा तेलवडे गावापर्यंत अपेक्षित असून उजवा तीर कालवा खोकरीपर्यंत गेल्यास शेतात दुबार पीक घेता येईल.
मनोज कमाने
स्थानिक शेतकरी