पेण | वार्ताहर |
पेण वाशी येथील दक्ष सिक्यूरिटी सर्व्हिसचे सर्वेसर्वा प्रविण पाटील यांच्यातर्फे दसर्याच्या मुहुर्तावर शुक्रवारी (14 ऑक्टोबर) रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दक्ष सिक्युरिटी सर्व्हिस हे गेले कित्येक वर्ष रायगड मध्ये कार्यरत असून सर्व सामान्यांच्या कार्यालय हौसिंग सोसायटी यांच्या सुरक्षतेची हमी घेते. मात्र कोरोना काळात रुग्णवाहिका नसल्याने अनेक जणांना आपला जीवन गमवावा लागला. ही बाब लक्षात घेउन प्रविण पाटील यांनी रुग्णवाहिका लोकसेवेसाठी देण्याचे ठरविले असून त्याचा लोकार्पण सोहळा प्रविण पाटील यांचे वडील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक गोपी पाटील यांच्या हस्ते वाशी येथील राहत्या घरी होणार आहे.