अमेरिका विश्वचषकातून बाहेर

वेस्ट इंडिजने अमेरिकेचा 9 गडी राखून पराभव

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

टी-20 विश्वचषकच्या 46 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने अमेरिकेचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा संघ 19.5 षटकांत केवळ 128 धावांवरच गारद झाला. प्रत्युत्तरात कॅरेबियन संघाने हे लक्ष्य 10.5 षटकांत केवळ एक गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यातील पराभवामुळे अमेरिकेचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजने दणदणीत विजयासह उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता गटातून उपांत्य फेरीच्या लढतीत फक्त दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे संघ उरले आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी वेस्ट इंडिजला अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागेल.

या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अगदी योग्य ठरला. यूएसएची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 3 धावांवर संघाला पहिला धक्का बसला. यानंतर आंद्रेस गॉस आणि नितीश कुमार यांनी काही काळ डाव सांभाळला पण ते बाद होताच संपूर्ण संघ कोलमडूला आणि संघ 19.5 षटकांत 128 धावांवरच मर्यादित राहिला. वेस्ट इंडिजकडून आंद्रे रसेल आणि रोस्टन चेस यांनी ३-३ बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना शाई होप आणि जॉन्सन चार्ल्स या सलामीच्या जोडीने विंडीजला झंझावाती सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 7 षटकांत 67 धावा केल्या. या काळात जॉन्सन चार्ल्सला केवळ 15 धावा करता आल्या पण शाई होपने अतिशय तुफानी खेळी खेळली. त्याने 39 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या. यूएसएचा आतापर्यंतचा प्रवासयजमान यूएसए संघ प्रथमच टी-20 विश्वचषक खेळला आहे. संघाने अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केली.

Exit mobile version