जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अमिषा भगत प्रथम

| पेण | वार्ताहार |
महात्मा गांधी वाचनालय व साप्ताहिक गर्जा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 मे रोजी महात्मा गांधी वाचनालय येथे खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्हयातील वेगवेगळया तालुक्यातील स्पर्धकांनी भाग घेतले होते. यामध्ये अलिबाग-पेझारी येथील अमिषा अनिरुध्द भगत हिने प्रथम क्रमांक पटकवला आहे.
या स्पर्धेमध्ये – जय महाराष्ट्र माझा, पाणी पेटत आहे, निसर्ग माझा सखा, यत्र नार्यस्त् पुज्यंते, असा घडवू या महाराष्ट्र, माझा शेतकरी बाप जगाचा पोशिंदा, समाज माध्यम विरुध्द वृत्तपत्र, अमृत महोत्सवी भारत, हे विषय झुम मिटींग ने देण्यात आले होते.

या विषयांच्या अनुशंगाने स्पर्धकांनी आपापले विषय मांडले. या स्पर्धेमध्ये अमिषा अनिरुध्द भगत प्रथम क्रमांक, तन्मय प्रदिप देशमुख (खोपोली) द्वितीय क्रमांक, दिपाली भास्कर भोईर (पेण) तृतिय क्रमांक पटकावले असून या स्पर्धेचे परिक्षण सार्वजनिक विद्या मंदिर ज्युनियर कॉलेजचे प्रा.एम.एन.पाटील, शिव व्याख्याते स्वप्निल म्हात्रे, प्राथमिक आदर्श शिक्षक रामकृष्ण भोईर यांनी केले. तर या स्पर्धेच्या बक्षिस समारंभाचे अध्यक्ष स्थान महात्मा गांधी वाचनालय पेणचे अध्यक्ष अरविंद वनगे यांनी भुषविले.

बक्षिस समारंभ महात्मा गांधी वाचनालयाचे कार्याध्यक्ष अप्पा सत्वे, प्रा.एम.एन पाटील, स्वप्निल म्हात्रे, भूषण कडू व गर्जा रायगड चे संपादक संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद म्हात्रे यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version