अमित पंघाल मानसिकदृष्ट्या सक्षम

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्यापूर्वी संघातून वगळण्यात आल्याचा सहन केलेला धक्का त्यामुळे अमित पंघालची मानसिकता कणखर झाली आहे. या ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय चमूतील तो मानसिकदृष्ट्या सक्षम असलेला खेळाडू असेल, असे मत माजी राष्ट्रकुल विजेता बॉक्सर अखिल कुमारने व्यक्त केले आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत अमितला पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले होते. त्यानंतर भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या एका तांत्रिक नियमामुळे अमितला संघातले स्थान गमवावे लागले होते. या सर्व आव्हानांचा सामना केल्यानंतर अमितने उमेद गमावली नाही. पॅरिस ऑलिंपिकसाठी त्याने आपली पात्रता सिद्ध केली. परिणामी त्याची मानसिकता मजबूत झाली आहे, असे अखिल कुमारने सांगितले. पिछेहाट होत असताना अमितने संधी मिळताच ती दोन्ही हाताने स्वीकारली आणि पॅरिस ऑलिंपिकसाठी 51 किलो गटात आपली पात्रता मिळवली.

Exit mobile version