। पुणे । वृत्तसंस्था ।
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे वय ७७ वर्ष असून तथापि काळजी करण्याचे काही कारण नाही अशी माहिती त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी दिली आहे. यापेक्षा अधिक काही सांगण्यास त्यांनी नकार दिला असून अमोल पालेकर यांना एका दीर्घ आजारावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.