शेकाप कामोठे अध्यक्षपदी अमोल शितोळे

पनवेल | प्रतिनिधी |
शेकाप कामोठे अध्यक्षपदी अमोल शितोळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. अमोल शितोळे हे मागील 20 वर्षांपासून कामोठ्यातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहेत. कामोठे येथून मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत रस्ता वाहतुकीसाठी सुरु केला. शाळेची मैदाने मुलांना खेळण्यासाठी खुली केली. तसेच कामोठ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करणे व मूलभूत प्रश्‍न सोडवण्यासाठी सिडको व महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. यावेळी कामोठे शहर चिटणीसपदी पंडित गोवारी, सहचिटणीस नाना भगत, उपाध्यक्ष अर्जुन डांगे व बाप्पू साळुंखे, प्रमुख संघटकपदी अल्पेश माने, व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश खरात यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकार्‍यांमुळे कामोठे वसाहतीमध्ये शेकाप संघटन बळकटीस चालना मिळाली आहे.

Exit mobile version