| अलिबाग । वार्ताहर ।
हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात (दि.21) श्री स्वामी समर्थ सभागृहात कै. श्रीमती मधुरा आणि कै. श्री. धर्माजी पांडुरंग मोकल यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराने दैनिक पर्यावरण आणि बागकाम तसेच इयत्ता दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना पीपीटीद्वारे पर्यावरण विषयक मार्गदर्शन रुपाली शाईवाले, प्रकल्प समन्वयक पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय पर्यावरण दिन, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन, जागतिक पाणथळ भूमी दिन, जागतिक जल दिन, वसुंधरा दिन, पर्यावरण विषयक विविध उपक्रम तसेच घरगुती घनकचरा व्यवस्थापन,कचरा निर्मितीची स्थाने,प्लास्टिकचे जीवन चक्र तसेच पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी उपाय प्लास्टिक पिशवीचे दुष्परिणाम, कापडी पिशवी माझी सखी, हा उपक्रम विद्यार्थ्यांना करण्यास सांगितला. अंजली रत्नाकर झाडांचे महत्त्व, झाडांची काळजी कशी घ्यावी वृक्षारोपण कधी करावं याविषयी मार्गदर्शन करून मुलांच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी आवड निर्माण करून दिली. प्रा डॉ.प्राची दामले, यांनी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी अनिल मोकल, सुबोध मोकल, यतीन मोकल प्रा. सदानंद पाटील, बी. डी.गायकवाड, व शिक्षक वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिकारे बी.जी, व अर्चना ठाकूर यांनी केले.